करमाळा-(सिध्दार्थ वाघमारे)
बिटरगाव श्री ता. करमाळा येथे 25 ऑक्टोंबर ते 31 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ह. भ. प. समाधान महाराज शर्मा, विशाल महाराज खोले, रामराव महाराज ढोक, अनिल महाराज तुपे, रूपालीताई सवने, निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार आहे.
31 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते बारा बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. 26 व 27 सप्टेंबर रोजी मृदंग अलंकार भरत पठाडे बीड यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून नाना पठाडे पोथरेकर उपस्थित राहणार आहेत. या किर्तन श्रवणासाठी तालुक्यातील भाविक भक्तांनी उपस्थित असे आवाहन आयोजक डॉ. अभिजीत मुरूमकर यांनी केले आहे.




Post a Comment