Header Ads Widget

 


करमाळा-
            करमाळा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत शिवसेनेचे तीन आमदार या तालुक्यात होऊन गेलेले आहेत. मध्यंतरी युवासेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले होते कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्याकडे युवक आकर्षित होत असून, आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी इनकमिंग पक्षामध्ये करणार आहे. सदर वृत्ताला दुजोरा मिळाला असून, मकाई सहकारी कारखान्याची निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. असे कुणाल पाटील यांनी नुकताच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रा.शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे. 
कुणाल पाटील यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत व युवासेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर मोठा जल्लोष साजरा केलेला दिसून आला. कुणाल पाटील यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क असून, आजपर्यंत त्यांनी विविध माध्यमांतून जनतेची सेवा केलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेवून सर्व सामान्यातील नेतृत्व निर्माण करण्याची धमक पाटील यांच्यात आहे. त्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेला नक्कीच बळकटी मिळणार आहे. 

यावेळी शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, युवासेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे, युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रमुख दादासाहेब तनपुरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत गोसावी, उपतालुका प्रमुख मनोज रोकडे, उपशहर प्रमुख अनिकेत यादव, उपतालुका प्रमुख विशाल पाटील, उपतालुका प्रमुख अनिकेत यादव इ. शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment