Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
         करमाळा शहरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान मांडले असून, सध्या करमाळा शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. करमाळा शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना या त्रासाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे करमाळा नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. असा गंभीर आरोप करमाळा नगरपालिकेचे मा. नगरसेवक अतुल फंड यांना केला आहे.
         पुढे बोलताना ते म्हणाले कि, संबंधित नगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणेला मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो कि, करमाळा तालुक्यातील दवाखान्यांची परिस्थिती बघितली तर एकही दवाखाना मोकळा दिसत नाही. प्रत्येक दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास सुरु झाली आहे. अक्षरशः संबंधित दवाखान्यांमध्ये उभा राहण्यास हि जागा राहते कि नाही? एवढे डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया, थंडी, ताप अशा आजारांनी त्रस्त झालेली करमाळ्यातील सर्वसामान्य जनता दिसून येत आहे. करमाळा शहरामध्ये बऱ्यापैकी गटारी उघड्याच आहेत. त्यामुळे शहरामध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. यावर प्राथमिक उपचार म्हणून प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करणे गरजेचे आहे. त्या तात्काळ करून घ्याव्यात अन्यथा करमाळा शहरातील नागरिकांसह नगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात येईल. याची दखल करमाळा नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. अशा प्रकारचा इशारा मा. नगरसेवक अतुल फंड व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी दिला आहे.


Post a Comment