Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
            भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, यांच्या नेतृत्वाखाली भाजपा VJNT सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. यामध्ये पुनवरचे उपसरपंच सुनील जाधव यांची भाजपा VJNT सेलच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर यावेळी नूतन तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांनी आपली कार्यकारिणी घोषित करत असताना, नूतन VJNT कार्यकारणीमध्ये तालुका सरचिटणीस पदी कविटगावचे सुरज भानुदास कुसेकर, तालुका उपाध्यक्ष श्याम रमेश माने (करमाळा), तालुका चिटणीस नितीन हनुमंत ननवरे (हिसरे) व बाबुराव भीमराव सुरवसे (मांगी) यांच्या निवड करण्यात आल्या आहेत.
          या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी अभिनंदन केले. तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी जनतेशी संपर्क करावा असे आवाहन केले. 

         यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, आजिनाथ कोळेकर वस्ताद, सोमनाथ घाडगे, भैय्याराज गोसावी, किरण शिंदे, हर्षद गाडे, अतुल इंदुरे, संजय किरवे, सागर सरडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment