माढा तालुक्यातील भोगेवाडी गावातील वाड्या-वस्त्यांवरून ड्रोन फिरत असल्याने, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये सप्ताह असल्यामुळे, गावातील नागरिक मंदीरामध्ये भजन, किर्तन ऐकण्यासाठी जात आहेत. अशातच हे ड्रोन फिरत असल्याने भाविक-भक्तांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील वाड्या-वस्त्यांवर ड्रोन फिरत असल्याची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून, सर्वत्र पसरत आहे. गावचे पोलीस पाटील राजकुमार काळे यांनी सदरची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली आहे. या ड्रोन संबंधी गावातील, वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी सावध रहावे. असे आवाहन पोलीस पाटलांकडून करण्यात आले आहे.
उपळवटे-प्रतिनिधी (संदिप घोरपडे)



Post a Comment