मनोज जरांगे-पाटील यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी ७ ऑगस्ट रोजी सोलापूर मध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता रॅलीचे निमंत्रण, जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने जरांगे-पाटील यांना देण्यात आले. या भेटीदरम्यान मराठा समाजासह बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी, शिक्षण व आरक्षणामध्ये सध्या उद्भवत असलेल्या अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये १)सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणी बाबत काढलेला शासन निर्णय, यामध्ये फक्त SEBC विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ती सरसकट सर्व मागासवर्गीय जातींना देण्यात यावी.
२) बहुजन समाज कल्याण विभागाने १४ जून २०२४ रोजी काढलेला शासन निर्णय SEBC, EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांसाठी ही लागू करावा. (१५५४ अभ्यासक्रमाबाबत)
३) केंद्र सरकारचे EWS आरक्षण SEBC च्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी लागू करावे.
४) OBC च्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्याप्रमाणे सरसकट लागू करावा.
इ. मागण्या जर आपण सरकार दरबारी लावून धरल्या, तर याचा अनेक विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये शिक्षणासाठी फायदा होईल. अशाप्रकारचे निवेदन देऊन सदरच्या मागण्या शासनाकडून मान्य करुन घेण्याबाबत, सर्व जाती-धर्माचे समाजबांधव आपल्यासोबत खांद्याला खांदा देऊन उभा असल्याचे, यावेळी प्रा. झोळ यांना जरांगे-पाटील यांना शब्द दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे, निलेश शिंदे, सुहास काळे पाटील, भीमराव ननवरे आदीजन उपस्थित होते.



Post a Comment