Header Ads Widget

 


उपळवटे-प्रतिनिधी (संदिप घोरपडे)
          करमाळा तालुक्यातील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम, या ठिकाणी पर्यावरणीय रक्षाबंधन, हा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी व छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिवचे मा.मुख्याध्यापक पांडुरंग चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी प्रथम परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

        यानंतर पांडुरंग चव्हाण सर यांनी बोलताना सांगितले कि, मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमानाने आहे. आपली जडणघडण  परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीमुळे झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करीत, ग्रामीण भागातील हे एक सुसंस्कार देणारे व्यक्तिमत्व विकास केंद्र असल्याचे प्रतिपादन मांडले. यावेळी त्यांनी पर्यावरणीय रक्षाबंधन या उपक्रमाविषयी माहिती दिली व "झाडे लावा-झाडे वाचवा" असा संदेश दिला. यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे ऑक्सिजन पार्क येथील विविध झाडांना राख्या बांधल्या. यानंतर उपस्थित सर्वांनी येथील सर्व झाडे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास प्राचार्य सुभाष कदम, प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment