Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
              मनोज जरांगे पाटील यांच्या ‌०१ ॲागस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करून प्रा. रामदास झोळ सरांनी सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे, प्रा. राजेश गायकवाड, फाउंडेशनचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           यावेळी बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात ५८ मुक मोर्चे निघाले. तरी ही याची सरकार दरबारी कोणती ही दखल घेतली गेली नाही. परंतु जरांगे-पाटील यांच्या माध्यमातुन आता मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तरी ०७ ॲागस्ट रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 


Post a Comment