करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
राज्यात महिला व मुलींवरील अन्याय अत्याचारांच्या घटना प्रसार माध्यमातून उजेडात येत असून, अन्याय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्याबाबत व नराधम आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात महायुतीचे सरकार कुचकामी ठरत आहे. असा जाहीर आरोप भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, बदलापूर येथे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. कोल्हापूर येथे दहा वर्षांच्या मुलींवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिरात आसरा घेतलेल्या महिलेवर पुजार्यांनी बलात्कार करून तिची हत्या केली. राज्यात छेडछाड, विनयभंग, आणि बलात्कार करुन महिला व मुलींच्या दिवसाढवळ्या हत्या केल्या जात असुन, सरकार मात्र चिडीचूप आहे. कुठे गेले 'बेटी बचाव बेटी पढाव'चा नारा देणारे?, शक्ती विधेयक कायदा का लागू करण्यात येत नाही? अत्याचार पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाने घेऊन, अशा घटना जलदगती न्यायालयात चालवून नराधम आरोपींना फाशीच शिक्षा दिली पाहिजे. अशी उत्तरेश्वर कांबळे यांनी मागणी केली आहे.



Post a Comment