करमाळा तालुका गटातटाच्या राजकारणाला कंटाळला असून सर्वसामान्य जनता, शेतकरी यांना न्याय देऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रा. रामदास झोळ सर यांना हिंगणी गावाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे मत, हिंगणी गावचे माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले. हिंगणी गावामध्ये प्रा. रामदास झोळ सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने जनसंवाद मेळावा २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये विविध गटामधील कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामदास झोळ सर यांना पाठिंबा देऊन झोळ परिवारामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आपण शैक्षणिक संकुलाची उभारणी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देऊन त्यांच्या बिलासाठी आंदोलन करून, न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. करमाळा तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून करमाळा तालुक्यातील वीज, रस्ते पाणी व आरोग्य याचबरोबर रोजगार निर्मिती करण्यासाठी एमआयडीसी च्या माध्यमातून विविध उद्योग आणून, शिक्षणाची सोय करण्यासाठी मोठे शिक्षण संकुल उभा करणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्याल अशी मला खात्री आहे. आपण टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेन असा विश्वास प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केला आहे.




Post a Comment