Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
          करमाळा येथे टेंभूर्णी-अहमदनगर या रस्त्याच्या कामासंदर्भात खा. धैर्यशील मोहिते-पाटील हे करमाळा येथे आले होते. बैठक संपल्यानंतर ते मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी व करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी सदिच्छा भेट दिली.
         यावेळी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी करमाळा शहरातील मुस्लिम समाजातील विकास कामासाठी निधी मिळावा यासाठी निवेदन दिले. यामध्ये करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून समजली जाणारी, नालसाहेब सवारी दर्गाहसाठी तीस लाख रुपये चा सभामंडप, महीबुब सबहानी दर्गाह सभामंडप साठी पंधरा लाख रुपये निधीची मागणी केली. तर लाॅकडाऊन काळात बंद झालेली मुंबई - विजापूर - मुंबई गरीब रथ रेल्वे चालू करण्यात यावी. व मुंबई - हैद्राबाद - मुंबई या रेल्वे ला दोन जनरल डबे अधिक जोडण्यात यावेत. कारण सामान्य जनतेला सुखकर प्रवास करता येईल असे यावेळी तांबोळी यांनी सांगितले.

         यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील व मा. आ. नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, इंदाज वस्ताद, वाजीद शेख, आतीक बेग, अफरोज पठाण, समीर वस्ताद, सोहेल शेख, शाहरूख शेख, असिम बेग, समीर सिकंदर शेख, अमन शेख, आफताब पठाण, मुजमिल सय्यद आदी जण उपस्थित होते.

Post a Comment