Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
             करमाळा येथे मंगळवार दि. १३ अॉगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रेचे अथर्व मंगल कार्यालय येथे आगमन होणार आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन मा. आ. नारायण पाटील यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना मा. आ. पाटील यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवनेरी किल्यावरून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा आपल्या करमाळा तालुक्यामध्ये मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आगमन करीत असुन, करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खा. संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादीचे खा. डॉ.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. 
            या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा तसेच शेतकरी, महिला, युवक यांच्या विरोधातील सरकारी धोरणाबाबत पोलखोल करण्यात येणार आहे. यामुळे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने करमाळा विधानसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आणि शिवस्वराज्य यात्रेला पाठींबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तसेच सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे. शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा ही ठिक दु. २ वा. होणार असुन, कार्यकर्त्यांनी करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात एकत्रित जमा व्हावे. असे आवाहन मा. आ. पाटील यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे, हनुमंत मांढरे-पाटील, बाजार समितीचे मा. संचालक देवानंद बागल तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment