करमाळा-
गजापूर गावातील मुस्लिम विरोधी दंगलीचा निषेध करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन, भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी निवेदन देऊन केला. सदर वेळी ‘विशाळगड येथील मुस्लिम विरोधी हल्ल्यातील सहभागी दंगेखोरांना, धर्माच्या आधारावर राज्य सरकार पाठबळ देत असल्याचे जाणवत आहे. तसेच या घटनेला आठवडा लोटल्यानंतर सुध्दा अद्यापपर्यंत गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून दंगलग्रस्तांची भेट घेवून त्यांना दिलासा दिलेला नाही. तसेच यातील सर्वच प्रमुख आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यावर सुध्दा अद्याप मोकळे फिरत आहेत. त्यामुळे ही दंगल सरकार पुरस्कृत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात १) सदर दंगलीतील सर्व दोषींविरूध्द UNLAWFUL ACTIVITY PREVISION ACT अर्थात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी. २) सदर घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व जबाबदार असणाऱ्या, राज्य सरकार व कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यावर तात्काळ निलंबन कारवाई करून, त्यांना देखील गुन्हयात आरोपी करण्यात यावे. ३) सदर घटनेत नुकसान झालेले घर, दुकान, वाहन व इतर स्थावर मालमत्तेची पुर्नउभारणी करण्यासाठी १०० टक्के पुर्नवसन राशी देण्यात यावी. ४) सदर घटनेत दंगलग्रस्त ठरलेल्या प्रती व्यक्ती ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. ५) सदर घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्हयातील संशयित आरोपी असलेले निवृत्त राज्यसभा सदस्य संभाजी व त्यांच्या इतर सहकार्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी. ६) सदर अनुषंगाने आपणास आवश्यक वाटेल त्या योग्य उपाय योजना करव्यात. सदरचे निवेदन देतेवेळी बलभीम कांबळे, सुखदेव गरड, प्रशांत कांबळे, सनी कांबळे, प्रदीप कांबळे, युवराज गरड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.






Post a Comment