करमाळा-
महाराष्ट्र राज्यासह करमाळा तालुक्यातील अनेक होतकरू विद्यार्थी राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा फॉर्म भरण्यासाठी नव्याने होणार असलेल्या सुधारणेत, एसईबीसी ते ओबीसी असा बदल विद्यार्थ्यांच्या हितासाठी करावा. अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली. असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली. याबाबत अधिक बोलताना बागल म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे करमाळा तालुक्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा फॉर्म भरलेली असून त्याची परीक्षा लवकरच होईल. परंतु नव्याने होऊ घातलेल्या सुधारणेत इ डब्ल्यू एस ते ओबीसी आणि ई डब्ल्यू एस ते एसइबीसी अशा बदलांची परवानगी देण्यात येणार असल्याचे समजते. परंतु त्यामध्ये एसइबीसी ते ओबीसी असा बदल करण्याची देखील तरतूद करावी. कारण पूर्वी ज्यांनी ईडब्लूएस ते एसइबीसी असा बदल केला आहे. त्यांना दरम्यानच्या काळात कुणबी दाखले मिळाले असून, अशा उमेदवारांना ओबीसी दाखले ही मिळाले आहेत. त्यामुळे या उमेदवारांकडे ओबीसी सर्टिफिकेट असून ही प्रत्यक्षात ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. 15 जुलै ते 14 ऑगस्ट या दरम्यानचे विद्यार्थी नवीन दाखले काढतील त्यांना सुद्धा ही संधी आहे. परंतु अशा उमेदवारांकडे जुने ओबीसी दाखले असून ही त्यांना संधी मिळत नाही. हा वास्तविक पाहता विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय आहे. तरी अशा सध्या राजपत्रीत संयुक्त पूर्व परीक्षा फॉर्म भरण्यासाठी, नव्याने होऊ घातलेल्या सुधारणेत एसइबीसी ते ओबीसी असा बदल करण्याची आवश्यकता असून, विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी शेवटी दिग्विजय बागल यांनी केली.




Post a Comment