Header Ads Widget

 


करमाळा-
           आदिनाथ कारखान्यावर मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला आल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता द्यावी. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिले होते. यावेळी उपस्थित तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या योजनेचा सर्वे करून प्रस्ताव सादर करा. असे मुख्यमंत्री यांनी आदिनाथच्या कार्यक्रमात सांगितले. नंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला रिटेवाडी उपसा सिंचन प्रस्ताव दाखल करा अशा सूचना दिल्या. हा सर्व पत्रव्यवहार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या पत्रानुसार झाला आहे. या संदर्भात शेवटी यांनी पुणे येथे जाऊन तत्कालीन कुकडी सिंचन मंडळाचे उपअधीक्षक अभियंता श्वेता पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानुसार रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा सर्वे करण्यासाठी जलसंपदाचे अधिकारी करमाळ्यात आले. 
           यावेळी संपूर्ण सर्वे केल्यानंतर ही योजना दोन टप्प्यात करावी. एक रिटेवाडी येथून पाणी उपसा करावा व दुसरा केतुर येथून पाणी उपसा करून सावडी पर्यंत पाणी न्यावे. असा तांत्रिक अहवाल जलसंपदा विभागाने आकडेवारीनुसार दिला. व या सर्वेनुसार उपअधीक्षक अभियंता श्वेता पाटील यांनी दिनांक 26 एप्रिल 2023 च्या पत्रानुसार ही योजना यशस्वी होऊ शकते असा अहवाल दिला. यानंतर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या लाभ क्षेत्रातील जवळपास 30 गावातील सरपंच प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट वर्षा बंगल्यावर घेतली. त्यावेळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा खात्याचे सचिव दीपक कपूर यांना फोन करून या योजनेला मंजुरी देऊन सर्वेसाठी पैसे द्या असे आदेश दिले. यानंतर काही गावचे सरपंच घेऊन मंत्रालयात रात्री आठ वाजता जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली. व याचा सातत्याने पाठपुरावा केला. आता 47 लाख रुपये या सर्वेसाठी मंजूर झाले आहेत. 

             सदरची रिटेवाडी उपसा सिंचन योजना माझ्यामुळे झाली. अशा बातम्या तथाकथित पुढारी देत आहेत हे सर्व धादांत खोटे असून या पुढाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. जे म्हणत आहेत कि काम माझ्यामुळे झाले, त्यांनी या संदर्भात आपण काय काम केले हे सांगावे? असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.


Post a Comment