करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथून 'आरक्षण बचाव यात्रा' दि. 25/7/2024 रोजी पासुन सुरु होणार आहे. यासंदर्भात टेंभुर्णी येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, जिल्हा महासचिव विशाल नवघरे उपस्थित होते. यावेळी टेंभुर्णी येथे यशपाल कांबळे यांनी वंबआ. पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला आहे. कांबळे यांनी सुरुवातीपासुन रिपाई युवा (आ.) आघाडीमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्याचप्रमाणे सध्या ते रिपाई युवा (आ.) आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांनी करमाळा तालुक्यातील अनेक उपेक्षित, पिडित बहुजन समाजातील घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने, मोर्चे तसेच वेळप्रसंगी प्रशासनाच्या विरोधात जनसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी उघडपणे भांडण्याची रोखठोक भुमिका घेतलेली आहे. कांबळे यांची तालुक्यामध्ये आक्रमक व रोखठोक भुमिका पाहून, अनेक युवा कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षबांधणी कौशल्याबरोबरच मोठे युवा फळीतील कार्यकर्ते आहेत. यशपाल कांबळे यांनी वंबआ. मध्ये प्रवेश केल्यामुळे, करमाळा तालुक्यातील वंबआ.ला मोठे हत्तीचे बळ मिळाले आहे. तसेच आक्रमक आणि पक्षासाठी स्थानिक, जिल्हा तसेच राज्यपातळीवर सामाजिक आंदोलनासाठी एक महत्वपुर्ण चेहरा मिळाल्याची भावना सर्वच ठिकाणाहून व्यक्त केली जात आहे. यशपाल कांबळे यांच्या वंबआ. पक्ष प्रवेशावेळी करमाळा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रमुख उपस्थिती लावत, कांबळे यांचे जोरदार स्वागत केले आहे.




Post a Comment