उपळवटे-प्रतिनिधी (संदिप घोरपडे)
करमाळा तालुक्यातील केम येथील नागनाथ मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना उपळवटे येथील नामदेव सपाटे यांनी त्यांचा मुलगा राजवर्धन नामदेव सपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात केले. यावेळी शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत श्री नागनाथ मतिमंद निवासी शाळा केम येथे सपाटे यांनी वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर नामदेव सपाटे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक नाळे सर यांनी केला. राजवर्धन याला शाळेतील कला शिक्षक चव्हाण सर, जाधव सर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले तर आभार नाळे सर यांनी मानले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यानंतर, उपस्थित मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी नाळे, जाधव, चव्हाण, थोरात, रवींद्र पाटील, रामचंद्र पाटील, बिना कोळेकर, सत्यवान सपाटे, नामदेव सपाटे, सुवर्णा सपाटे, आकांक्षा सपाटे, प्रिया सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment