करमाळा-
तालुक्यातील अंजनडोह, केडगाव येथील आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल होऊन, तब्बल २० दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन गेले. तरीही आरोपी मोकाट असून त्यांना अटक न झाल्याने 'जवाब दो आंदोलन व निदर्शने' करणार असल्याचे निवेदन RPI (A.) युवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांनी तहसीलदार, पोलिस स्टेशन तसेच विभागीय अधिक्षक यांना दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, मौजे अंजनडोह येथील फिर्यादी नितीन बापू चव्हाण यांनी दिनांक 4/6/2024 रोजी फिर्याद दिलेली होती. यामध्ये आरोपी 1) सुरज केशव गोरे, 2) महादेव दशरथ माने 3) केशव गोरे यांच्यावर भांदवि कलम 306, 504, 34 व ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत 3(2) (5) व 3(2) (va) असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तरीही अद्याप पर्यंत आरोपींना अटक झालेली नाही. तसेच मौजे केडगाव येथील फिर्यादी शितल रमेश खरे यांनी दिनांक 29/5/2024 रोजी फिर्याद दिलेली होती. यामध्ये आरोपी 1) विठ्ठल खामकर 2) नाना खामकर 3) तात्या खामकर 4) बापू खामकर 5) पप्पू खामकर 6) कुंडलिक खामकर भांदवी कलम 427, 504, 506 ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत 3(1) (r), 3(1) (s), 3(2) (va) असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना देखील, अंजनडोह येथील घटनेप्रमाणेच यातही आरोपींना अटक झालेली नाही. सदरील घटनेतील आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. अशा आशयाचे पत्र देऊन देखील आतापर्यंत आरोपींना अटक केली गेली नसल्यामुळे, शुक्रवार दि. 28/6/24 रोजी दु 12:30 वाजता गायकवाड चौक येथून तहसील कचेरीवर “जवाब दो”आंदोलनातर्गत भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.





Post a Comment