Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
 
              करमाळा तालुक्यामध्ये बऱ्याचशा वहित शेतजमिनी वर्ग-2 किंवा फॉरेस्ट मध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या पीकविमा योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेपासुन वंचित राहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन देऊन तालुक्यामध्ये पोटखराब दाखविण्यात आलेल्या जमिनीची नोंद वहित जमीन करण्यासंबंधी निवेदन दिले आहे.

           सदरच्या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि, करमाळा विधान सभा मतदार संघातील करमाळा तालुक्यामध्ये वर्ग-2 चे व फॉरेस्ट असे तालुक्यामध्ये बरेच क्षेत्र आहे. त्यामध्ये ते क्षेत्र वहित ऐवजी पोटखराब मध्ये दाखवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा भरता येत नाही. सदर शेतकऱ्यांच्या शेतात पीक पाणी असून शेत जमिन वहित आहे. परंतु सदरच्या जमिनीची नोंद पोटखराब मध्ये दाखविल्याने संबंधित शेतक-यांनी पिक विमा भरता येत नाही. तरी कृपया सदरच्या जमिनीची नोंद पोटखराब मधून वहित जमीन अशी नोंद करणे बाबत संबंधिताना आपले आदेश व्हावेत अशा प्रकारचे निवेदन बागल यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिलेल्या निवेदनातुन विनंती केली आहे.


Post a Comment