करमाळा-
नाशिक काळाराम मंदिर परिसरात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी प्रवेश करू नये. तसेच निळे, पिवळे झेंडे घेऊन येऊ नये. अशा आशयाचे पत्रक वाटणाऱ्या आरोपी तसेच त्याच्या संघटनेवर कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन RPI(A.) युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांचे वतीने देण्यात आले. तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हिंदू युवा वाहिनी या जातीवादी संघटनेचा अध्यक्ष प्रथमेश चव्हाण, याने काळाराम मंदिर परिसरात कोणत्याही शुद्राने महार, मांग, चांभार, ढोर यांनी प्रवेश करू नये. व निळा, पिवळा झेंडा अजिबात लावू नये त्या सर्वांना वाळीत टाकण्यात येईल. अशा धमकीचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे पुढील काळात दीन-दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो याची ही दाट शक्यता आहे. हिंदू युवा सेना या जातीवादी संघटनेने ट्रायल बेसवर चाचपणी करण्यासाठी हे पत्रक काढले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंदू युवा वाहिनी या संघटनेवर तात्काळ बंदी घालून, व त्यातील सर्व पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून, कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. अन्यथा या पुढील काळामध्ये RPI (A.) युवक आघाडीच्या वतीने व नागेश (दादा) कांबळे मित्र परिवाराच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. अशा प्रकारचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. यावेळी RPI (A.) युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे, प्रसेंजित कांबळे, पत्रकार प्रफुल्ल दामोदरे, रणजित कांबळे, मयूर कांबळे, अमोल गायकवाड, स्वप्निल काळे, विजय कांबळे, कालिदास पवार, अभिषेक रंदवे, आर्यन जाधव, फैजल शेख, अक्षय आलाट, आलिम शेख, तुषार शिंदे, सचिन गायकवाड, आदित्य दोशी (केडगाव), संकेत शिंदे, ओंकार शिंदे, अक्षय जाधव, प्रशांत जाधव, अनुराग शिंदे, अशोक बनसोडे आदी जण उपस्थित होते.





Post a Comment