Header Ads Widget

 


करमाळा-
               करमाळा तालुक्यामध्ये अवैधरित्या चालणाऱ्या व्यवसायाला आळा घालण्याचे काम करमाळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. मटका बंद झालेला असला तरी चक्री जुगार मात्र जोमात सुरु झाला आहे. एस. टी.  स्टॅन्ड च्या परिसरात सर्वसामान्य गोरगरीब या चक्री जुगाराला बळी पडत आहेत. त्याच्या कडे लक्ष देण्याची मागणी सर्व सामान्य जनते मधून होत आहे. अशा प्रकारचा आशावाद हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
          पुढे बोलताना मांढरे-पाटील म्हणाले कि, मटका बंद केल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमधून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कार्यवाहीचा धडाका लावल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. अवैध व्यवसाय करणारे मटकाकींग करमाळा शहरामध्ये किराणा दुकान टाकल्या सारखे बिनधास्तपणे गाळ्यामध्ये तर काही जण अतिक्रमणाच्या जागेवर पानटपरीच्या नावाखाली बिनधास्तपणे मटका व्यवसाय करताना दिसत आहेत. मटक्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे, मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणारांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. घरातील कर्ता पुरुष मटक्या सारख्या जुगाराच्या आहारी गेल्यामुळे अनेकांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे. याचे गांभिर्य ओळखत मटक्याला आळा बसवण्याचे काम पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी तालुक्यातील जनता नेहमीच उभी राहते. असे प्रकारचे मत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.


Post a Comment