Header Ads Widget

 


करमाळा- (संदिप घोरपडे)
          करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील अजितदादा पवार विद्यालयाचा निकाल 97.40% लागला आहे. शाळेची विद्यार्थिनी जाधव नम्रता दीपक हिने 91.60% मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अवघडे मानिनी भैयासाहेब 89.60% मार्क मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कामटे गीतांजली भरत हिने 89.40% मार्क मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तरी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन राजे श्री शिवछत्रपती युवक संघटना केमचे संस्थापक मारुती पारखे तसेच संस्था संचालक प्रतिनिधी गोरख पारखे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे शाळेचे शिक्षक मोरे सर यांनी या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले असल्याने मोरे सर यांचे ही कौतुक वडशिवणे गावांमधून होत आहे.
         अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे शाळेचे मुख्याध्यापक भोसले बी. आर., मोरे एन. टी, देवकर एस. व्ही., खंडाळे डी. एम., कोरे पी. एम., नागणे डी. एम., भागवत एम. एम., कोरे एस. आर. यावेळी सर्व उपस्थित होते.


Post a Comment