करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
नोबल इंग्लिश मिडियम स्कुल रोशेवाडी ता. करमाळा या शाळेने यशाची परंपरा कायम राखत या वर्षी देखील १००% निकाल लावला आहे. शाळेमध्ये प्रथम क्रमांक धनश्री मंगेश जगताप, द्वितीय क्रमांक रेहान इम्रान सुभेदार, तृतीय क्रमांक आदित्य देवानंद बागल यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले आहेत. तरी शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी या आधीसुध्दा विविध क्षेत्रामध्ये यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकिल, पोलीस तसेच विविध कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी गुणवत्तापुर्ण शिक्षण घेऊन मोठ्या पदांपर्यंत गेले आहेत. तरी येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या गुणवत्तापुर्ण शिक्षणाची परंपरा आम्ही कायम ठेवणार असल्याची ग्वाही मुख्याध्यापिका शितल वाघमारे मॕडम यांनी दिली आहे. शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन तसेच कौतुक संस्थापिका अध्यक्षा आसादे मॕडम यांनी केले आहे. तर वर्गशिक्षिका- शितल वाघमारे मॕडम, विद्या एकतपुरे मॕडम, मंगल जगताप मॅडम, सुनंदा दुधे मॅडम, कबीर सर, रजनी साळुंके मॅडम, सविता माने मॅडम, किर्ती पाचकवडे मॅडम, दिक्षा गायकवाड मॅडम, रूपाली कानडे मॅडम यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे.




Post a Comment