दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं-१ चा इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला. सलग १० वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रशालेचे यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे.
१) सायली भैरवनाथ झोळ:- ९५.२०%, २) रिद्धी भाऊसाहेब चोरमले:-८९.४०%, ३) भाग्यश्री माधव बंडगर:- ८८.४०%, वाशिंबे केंद्रात कुमारी सायली भैरवनाथ झोळ हिने ९५.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कुमारी सायली भैरवनाथ झोळ या विद्यार्थीनीने गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात १०० पैकी ९८ मार्क मिळवले. कुमारी रिद्धी भाऊसाहेब चोरमले या विद्यार्थीनीने हिंदी विषयात १०० पैकी ९५ गुण व मराठी विषयात १०० पैकी ९३ गुण मिळवले आहेत. प्रशालेचे तब्बल ९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाला आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शना बरोबर प्रत्येक महिन्याला टेस्ट सिरीज, गेस्ट लेक्चर, पेपर संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले जाते. तरी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर, उपाध्यक्ष राणा सुर्यवंशी, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट सौ. नंदा ताटे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, स्कूलचे प्राचार्य विजय मारकड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



Post a Comment