Header Ads Widget

 


करमाळा- 
          करमाळा नगरपरिषद हद्दीमध्ये राहणाऱ्या रेणुका नगर येथील नागरिकांना करमाळा नगरपरिषदेकडून कोणत्याही नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे, येथील पिडित नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सदरच्या आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र नगरविकासमंत्री, सोलापूर जिल्हाधिकारी, करमाळा तहसिलदार, करमाळा पोलीस स्टेशन यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत. तरी सदरचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा शहर उपाध्यक्ष करण आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे. सदरच्या निवेदनामध्ये खालीलप्रमाणे मजकुर देण्यात आला आहे.
            करमाळा नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या रेणुका नगर परिसरात ३० ते ३५ वर्षांपासून  ४० ते ५० कुटुंब राहतात. त्या परिसरात अद्यापही रस्ते व गटारी इ. सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच येथील महिला व पुरुषांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध नाही. येथील महिला शौचास उघड्यावर जातात तसेच काही महिला झाडांना पडदे लावून शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने येथील परिसरात साथीचे रोग पसरून नागरिक आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच परिसरात गटारी उपलब्ध नसल्याने येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या ठिकाणी नगरपालिकेची घंटागाडी सुद्धा येत नाही.
          तरी करमाळा नगरपरिषद प्रशासनाने रेणुका नगर येथे शौचालय, गटारी व रस्ते उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा करमाळा नगरपरिषदे समोर रेणुका नगरमधील सर्व पिडीत नागरिकांसमवेत आम्ही दिनांक २८/०५/२०२४ रोजी ठीक ११ वा. ठिय्या मांडून बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत. याची करमाळा नगरपरिषदेने दखल घ्यावी. तरी पीडित नागरिकांना नागरी सुविधा न पुरविल्यामुळे, आंदोलनकर्त्यांची पूर्ण जबाबदारी करमाळा नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांची  असेल. याची करमाळा नगरपालिकेने नोंद घ्यावी. तरी वरील आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आपणांस नम्र विनंती....

Post a Comment