करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने, काढणीला आलेल्या फळबागा व पिकांची नासाडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये तर सर्वत्र गारपीठ व सोसाट्याच्या वाऱ्याने शेतकऱ्यांचे व जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या बॕनरचे मोठे नुकसान झाले आहे. याच अनुषंगाने आज दि. १० मे रोजी करमाळा शहर व तालुक्यात सायंकाळी ५.३० वा. पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या हलक्या पावसाच्या सरीनी अनेक दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. व वातावरणात गारवा पसरला आहे. पुणे, अ.नगर, बीड, सातारा, लातुर, सांगली तसेच राज्याच्या इतर ही भागात अवकाळी पावसाने फळबागा व पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्यामुळे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.



Post a Comment