करमाळा- (प्रविणकुमार अवचर)
मांगी येथील प्रगती विद्यालयाचा दहावी परीक्षा मार्च 2024 निकाल, यावर्षी 97.87% एवढा लागलेला असून, यावेळी दहावीसाठी एकूण 47 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 46 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून, प्रगती विद्यालयात प्रथम क्रमांक कु.जमदाडे हर्षदा हनुमंत 92.20%, द्वितीय क्रमांक कु .बागल गौरव प्रदीपकुमार 90.80% टक्के, तृतीय क्रमांक कु. बागल प्रसिद्धी दीपक 88.80% गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे कु.बागल नक्षत्रा अमोल 87.80% व कु.जमदाडे भारती हरिश्चंद्र 85.40% यांनी सुद्धा उत्तम प्रकारे गुण मिळविले आहेत. प्रगती विद्यालयाचे शिस्तप्रिय वातावरण तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, यामुळे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी वाव मिळत आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अध्यक्षा श्रीमती शामलताई बागल, उपाध्यक्ष अमऋषी देशमाने, ,संचालिका सौ. रश्मी बागल, युवा नेते दिग्विजय बागल व मुख्याध्यापिका अनुपमा देवकर यांनी अभिनंदन केले.




Post a Comment