उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)
माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर येथील संचिता चंद्रकांत मगर ह्या विद्यार्थिनीने 90.45% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल आई-वडिल व महर्षी शंकरराव मोहिते-पाटील प्रशाला यशवंतनगर, शाळेतील शिक्षकांनी व गावातील मंडळींनी तिचे कौतुक केले आहे. संचिताला येणाऱ्या काळामध्ये इंजिनीयर व्हायचे असल्याचे, तीने दहावीतील मिळविलेल्या यशानंतर सांगितले आहे. चिकाटी व जिद्दीच्या जोरावर आपण कोणतेही स्वप्न पुर्ण करु शकतो. अशाप्रकारचा आशावाद संचिताने यावेळी बोलुन दाखविला. यावेळी संचिताचे कौतुक करण्यासाठी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील प्रशाला यशवंत नगरचे सर्व शिक्षक स्टाप, आई-वडील व विद्यार्थी आदीजण उपस्थित होते.




Post a Comment