Header Ads Widget

 


करमाळा- 
                करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनता हे माझं एक कुटुंब आहे. करमाळ्यासह सर्व मतदार संघातील विविध विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक प्रामाणिकपणे केलेली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी, व आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, मला येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुनश्च एकदा संधी द्यावी. व ती आपण द्याल! असा आत्मविश्वास खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा येथे व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल, जिल्हा भाजपा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव व आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजपाचे राज्य निमंत्रित कार्यकारणी सदस्य दिपक चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
          आज करमाळा येथील भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मीदिदी बागल यांच्या निवासस्थानी खा. निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देऊन, करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखाना, मकाई कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मार्केट कमिटी, जिल्हा दूध संघ या मधील सर्व आजी-माजी संचालक, सदस्य, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रारंभी लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल यांच्या प्रतिमेचे पूजन खा. निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रास्ताविक मकाईचे माजी चेअरमन व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी केले. आपल्या भाषणातून त्यांनी खा. निंबाळकर यांनी मतदारसंघांमध्ये विशेषतः करमाळा तालुक्यामध्ये विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिला. व त्यांचा सातत्याने असलेला जनतेशी संपर्क ही त्यांची मुख्यतः जमेची बाजू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळे जनता आणि मतदार त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील. व आम्ही सर्व पदाधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व रश्मीदिदींच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातून जास्तीत-जास्त मताधिक्य देऊन, त्यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे अभिवचन दिले.

           यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांनी सांगितले कि, करमाळा तालुक्यातील खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. यामध्ये जातेगाव ते टेंभूर्णी या 56 किमी रस्त्याच्या कामासाठी 1234 कोटी रू. मंजूर करून आणले आहेत. तसेच रिटेवाडी उपसा सिंचन व माढा तालुक्यातील बेंद ओढ्याच्या कामासंदर्भात खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्या ही कामाला गती मिळत आहे. असा विश्वास व्यक्त करून करमाळा तालुक्याच्या उर्वरित प्रश्नांचा पाठपुरावा करून, भविष्यामध्ये तालुक्याचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी खा. निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गाफील न राहता आज या क्षणापासून कामाला लागायच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपसामध्ये योग्य तो समन्वय व संपर्क ठेवण्याचे आवाहन ही त्यांनी केले. 

         यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा भाजपा अध्यक्ष चेतनसिंग केदार यांचा सत्कार दिग्विजय बागल यांचे हस्ते झाला. तर आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय संचालक पदी निवड झाल्याबद्दल विलासराव घुमरे यांचा सत्कार खा. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इयत्ता अकरावी शास्त्र शाखेमध्ये 88% गुण मिळाल्याबद्दल कुमारी पायल कुदळे या विद्यार्थिनीचा ही सत्कार रश्मीदिदी बागल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव व आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, जिल्हा भाजपा अध्यक्ष चेतनसिंग केदार यांची समयोचित भाषणे झाली. तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर यांनी केले.

         यावेळी या कार्यक्रमास भाजपचे सर्व पदाधिकारी मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे, मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन चिंतामणी जगताप, माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, राज्य निमंत्रित भाजपा सदस्य दिपक चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, जितेश कटारिया, नरेंद्र ठाकूर, प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, महिला मोर्चा करमाळा तालुका अध्यक्ष रेणुका राऊत, लक्ष्मण केकान, नितीन झिंजाडे, माळशिरस तालुका भाजपा विस्तारक संजय घोरपडे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी, बाळासाहेब कुंभार, माजी सभापती भाग्यश्री शिंदे, रसिका महाडिक, सोनाली डावरे, साधनाताई खरात, नगरसेविका राजश्री माने, मकाईचे सर्व संचालक, आदिनाथचे सर्व संचालक, नगरसेवक, मार्केट कमिटी संचालक, भाजपा पदाधिकारी यांचे सह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment