Header Ads Widget

 


करमाळा-
            हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान इफ्तार पार्टीचे आयोजन, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे ता. अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी व नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांनी आयोजन केले होते. या रोजा ईप्तार पार्टीमध्ये मुस्लिम समाजासह करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, माढा लोकसभेचे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, नगरसेवक संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष वारे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रवीण कटारिया, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शिंदे, माजी नगरसेवक फारूक जमादार, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे, विनय ननवरे, दादासाहेब इंदलकर, राजेंद्र घाडगे, कंदरचे सरपंच मौला मुलानी, केमचे उपसरपंच सुलतान शेख, अमोल यादव, सचिन घोलप, विजय लावंड, पत्रकार जयंत दळवी, नासीर कबीर, सिध्दार्थ वाघमारे, विशाल परदेशी, हर्षवर्धन गाडे, रणजित ढाणे, बाळासाहेब इंदुरे, अशपाक जमादार आदी जण या ईप्तार पार्टीसाठी उपस्थित होते.
          सर्व प्रथम सायंकाळी सहा वाजुन पंचेचाळीस मिनिटांनी मौलाना मोहसीन, मौलाना सिकंदर यांनी प्रार्थना केल्यानंतर उपवास सोडण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या वतीने फळे, खजुर, शरबतची व्यवस्था करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीमध्ये बोलताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की, मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असून, या महिन्यात मुस्लिम बांधव एक महिन्याचा उपवास करतात. आणि या महिन्यात खऱ्या अर्थाने आपल्या वाईट सवयी नष्ट करण्यासाठी हा पवित्र महिना आहे. दैनंदिन जीवनात धावपळ करून माणूस अध्यात्मापासून दूर जातो. परंतु रमजान या पवित्र महिन्यात त्याला एक उत्तम संधी मिळते. आणि या संधीचा फायदा घेऊन परमार्थ साधण्याचा प्रयत्न करावा असे घुगे यावेळी म्हणाले.

       माढा लोकसभा मधील इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप म्हणाले की, या जगाचा स्वामी ज्याला आपण ईश्वर परमेश्वर अल्लाह म्हणतो तो या जगाचा दाता आहे. रमजान महिन्यात नमाजरुपी प्रार्थनेतून ईश्वराची आराधना करण्याचे कार्य केले जाते. रमजानचा उपवास म्हणजे भुक-तहान यावर आपण स्वतः नियंत्रण ठेवतो. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो इतर गोष्टीवर ही जय मिळवू शकतो. या दुनियेत आपण कसे जगावे? याचा आदर्श या रमजान महिन्याच्या माध्यमातून ईश्वराने दिले आहे. याप्रमाणे वागल्यास जीवन नक्कीच यशस्वी होईल असे ते यावेळी म्हणाले.
        या रोजा ईप्तार पार्टीचे तांबोळी बंधुनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमीरशेठ तांबोळी यांनी केले. ही इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी हाजीअतिक बेग, वाजीद शेख, तौफिक शेख, मुख्तार पठाण, इंदाज वस्ताद, अशपाक सय्यद, अलीम शेख, अफरोज पठाण, मोहसीन पठाण आदी जणांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment