कुर्डूवाडी-प्रतिनिधी (शरद भालशंकर)
कुर्डूवाडी केंद्राची शिक्षण परिषद दि. 25/07/2023 रोजी संपन्न झाली. प्रशासनाधिकारी महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती कुर्डूवाडीचे पांचाळ सर, केंद्रसमन्वयक लक्ष्मण करंडे, प्राचार्य रोहिदास सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या वेळी 'शालेय स्वच्छता' या विषयावर कापसे सर यांनी विचार व्यक्त केले. 'सेतू अभ्यास' या विषयावर मुख्याध्यापक शाळा नंबर 4, 'निपुण भारत' या विषयावर माळी सर, 'शाळा सिद्धी' या विषयावर मार्गदर्शन मुख्याध्यापक अविनाश भालशंकर सर यांनी केले. या वेळी शहरातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. आभार शाळा नंबर 8 चे मुख्याध्यापक जाधव सर यांनी मानले.



Post a Comment