करमाळा-प्रतिनिधी
स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाच्या औचित्याने सुर्यवंशी यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम पाहून, त्यांच्याच संकल्पनेतुन संस्थेच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदरच्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राणादादा सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकीची जपणूक करता यावी. व समाजात अनाथ असलेल्या बालकांविषयीची सुर्यवंशी यांची असलेली तळमळ, लक्षात घेऊन इंदापूर येथील श्रावणबाळ अनाथ आश्रमातील मुलांना विविध संगीत उपकरणांची (हार्मोनियम, मृदूंग, वीणा) भेट देऊन, तेथे राहणाऱ्या मुला-मुलींच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर सदर मुला-मुलींना भेट देण्यात आलेली संगीत उपकरणे, वाजवून सुंदर अशा धार्मिक गीतांद्वारे राणादादा सुर्यवंशी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तु व खाऊंचे वाटप करण्यात आले. यावेळी अनाथ मुलांविषयीचा राणादादा यांचा भावनिक संदेश उपस्थितांनी वाचुन दाखविला. सदर कार्यक्रमासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे डॉ. सचिन ढेरे, संदिप शहाणे, जीवनकुमार सोडळ, प्रा. भैरवनाथ व्यवहारे, प्रा. पुजा बनसुडे तसेच आश्रमातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment