Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी 
        महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून, करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे नुतन प्राथमिक आरोग्य केंद्र, जिंती येथे उभा केले आहे. 2 वर्षांपुर्वीच या आरोग्य विभागाचे काम पुर्ण झालेले आहे. जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या 4 वर्षांपासून फक्त वैद्यकीय आधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,कर्मचारी नसल्याने धूळखात पडून आहे. तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोफळज, उमरड, वडशिवणे, गुळसडी, सावडी, बिटरगांव, पाडळी ,पांगरे, पोथरे  येथे इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन तयार आहे. 

           याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कर्मचारी, मदतनीस यांची तात्काळ नेमणूक करून, सदरील प्राथमिक आरोग्य केंद्रे, तात्काळ सुरू करण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, उत्तरेश्वर कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे सुरू झाल्यास सर्व सामान्य नागरीकांची (रूग्णांची) सोय तातडीने होण्यास मदत होईल. असे निवेदनात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे भरतीच्या प्रक्रियेत कर्मचारी नेमणूकीत स्थानिक उमदेवारांना प्राधान्य देण्यात यावे. अशा प्रकारची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment