करमाळा-प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने २१ नोव्हेंबर २०२२ सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्य सरकारने तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी शासनाने टीसीएस व आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपनी मार्फत पद भरतीसाठी शासन अवास्तव परीक्षा शुल्क म्हणुन, सर्वसाधारण साठी १०००/ रुपये व मागासवर्गासाठी ९००/ रुपये शुल्क भरावी लागत आहे. तर इतर खर्च १००/ रुपये पर्यंत होतो. सध्या तलाठी भरतीसाठी साधारणता अंदाजे अकरा लाख अर्ज आल्याचे समजते. आणि यातुन शासनाला तब्बल एकशे दहा कोटीचा महसुल जमा होतो. ही एक प्रकारे सुशिक्षित बेरोजगार युवकांची लुट असुन, याकामी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लक्ष घालुन हे परिक्षा शुल्क कमी करावे. अशी मागणी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी मुख्यमंत्र्याकडे ईमेल करून मागणी केली आहे. राज्य सरकार आगामी काळात अनेक विभागातील रिक्त जागेवरील कर्मचाऱ्यांची भरती करेल. या वेळी महाराष्ट्र राज्यातुन अंदाजे एक कोटी अर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार युवकाला पाच ते सहा ठिकाणी विविध पदाच्या भरतीसाठी अर्ज भरावे लागणार आहे. नोकरीसाठी अर्ज भरणारा सुशिक्षित बेरोजगार युवक हा आधीच बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. सध्या महागाईने कळस गाठला आहे. बरेच सुशिक्षित बेरोजगार युवक हे शेतकरी, शेतमजुरांची मुले आहेत. तरी याबाबत मुख्यमंत्र्यांनी शासन स्तरावर निर्णय घेऊन, कमीत-कमी परीक्षा शुल्क करण्यात यावे अशी मागणी जमादार यांनी केली आहे.




Post a Comment