Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
               करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील फिसरे ते कोळगाव हा रस्ता त्वरीत करावा, अन्यथा मनसेच्या वतीने 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांना दिला आहे. येथील 
रस्त्याची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे कि, तेथील नागरीक कसे ये-जा करतात? हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. संबंधीत भागातील लोकप्रतिनिधी या भेडसावणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते. या अनुषंगाने या भागातील रस्ता खराब असल्यामुळेच, या भागातील शेतकरी करमाळा बाजारपेठे ऐवजी परांडा बाजारपेठेत जातात. जर करमाळा तालुक्यातील शेतकरी बाहेर तालुक्यात गेला, तर आपली बाजारपेठ कशी चालणार? त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन रस्ता तयार करावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे.

Post a Comment