करमाळा-प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारचे उपक्रम लोकांपर्यंत पोचतात हे भाजपा सोशल मीडियाच यश आहे. असे प्रतिपादन करमाळा भाजपचे तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश चिवटे यांनी केले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन 9 वर्षे झाली. यामुळे मोदी @9 या उपक्रमांतर्गत करमाळा भाजपा सोशल मीडिया टीमची बैठक, भाजपा कार्यालयात उत्साहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीत बोलताना करमाळा भाजपा सोशल मीडिया तालुकाप्रमुख नितीन झिंझाडे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने गेल्या 9 वर्षाच्या कालावधीत अनेक लोक उपयोगी कामे केली आहेत. याचा लाभ देशातील कोट्यावधी जनतेला झाला आहेत. हे केलेले काम जनतेपर्यंत पोचवण्यात भाजपा सोशल मीडिया टीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सोशल मीडिया हा भाजप पक्षाचा आत्मा आहे. मोदी सरकार व जनता यांच्यामधील दरी कमी करण्याचे काम आपल्या सोशल मीडिया टीमने केले आहे. त्यामुळे सरकार व जनता यामध्ये दुवा म्हणून सोशल मीडिया कार्यकर्त्यांचे असणारे योगदान महत्वपूर्ण आहे. भाजपा सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी आपण या मिटिंगचे आयोजन केले असलेचे त्यांनी म्हटले. यावेळी वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार हे प्रास्ताविक करताना म्हणाले की, मोदी @9 या उपक्रमांतर्गत सोशल मीडिया टीमने मोदी सरकारच्या काळातील योजना व धोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी जास्तीत जास्त काम करावे. करमाळा तालुक्यात भाजपचे काम वाढवण्यासाठी आपल्याला जम्बो सोशल मीडिया टीम करायची आहे. यावेळी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, मोहन शिंदे, धर्मराज नाळे, संदीप काळे, पत्रकार अंगद भांडवलकर, पितांबर कुकडे, विनोद महानवर, भैय्याराज गोसावी, बजरंग मोहोळकर, किरण शिंदे, गोकुळ अनारसे, किरण बागल, राजु पवार, मनोज मुसळे, विनोद इंदलकर, प्रकाश ननवरे, हर्षद गाडे, राजेश पाटील, कैलास पवार, सागर सरडे, सुनील जाधव, राज शेख, लक्ष्मण काळे, दत्ता रायकर, सोमा साळवे, शिवम गोसावी, शुभम नलवडे, लखन आवटे, नागेश ढेरे, दिगंबर कानगुडे, अक्षय कानगुडे, रोहन काळे, राज नलवडे, आकाश कानगुडे, शुभम साळवे आदि पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment