करमाळा-प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी @9 जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जेऊर येथे भुषण लुंकड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जेऊर येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन काही अडचणी चिवटे यांच्या समोर मांडल्या. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, सुवर्णकारध्यक्ष अमोल महामुनी, प्रवासी संघटनेचे व नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण अशोक माळवे, अतुल घाडगे ,भूषण लुंकड, रवी माळवे, गणेश आमृळे, नितीन मंडलेचा, प्रवीण करे, बाबू महामुनी, दत्ता मारकड, नितीन घोडके, अक्षय किरवे, गाईंवर पेंटर ,शेख साहेब, ओंकार वेदपाठक व जेऊर येथील नागरिक उपस्थित होते.



Post a Comment