करमाळा-प्रतिनिधी
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले कि, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. आज सर्वच जण राजर्षी शाहूंच्या नावाचा जयजयकार करत असले तरी, शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजवण्याची आवश्यकता आहे. शालेय अभ्यासक्रमात राजर्षी शाहूंच्या विचारांचा व्यापक समावेश व्हायला हवा. समाज मन बदलण्यासाठी नव्हे तर छोट्या-छोट्या पण गोष्टीमधून ही हा विचार रुजवला जायला हवा. आणि हि जबाबदारी प्रत्येक पालकाची राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याची आहे. त्यासाठी शाहूंच्या विचारांवर चालण्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी. हिच राजर्षी शाहु महाराजांना खरी आदरांजली ठरेल. असे खटके यांनी सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील, शहराध्यक्ष अतुल निर्मळ, विश्वनाथ सुरवसे, आदिनाथ माने, पिंटू जाधव, अजित पवार, गणेश चव्हाण, सागर लोंढे, रंजीत कांबळे, सागर जाधव, अविनाश घाडगे, अजित उपादे, सागर बनकर, नितीन घोगरे, संपत लवळे, गोटू मोरे, अमोल गुंड इत्यादी युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



Post a Comment