करमाळा-प्रतिनिधी
उपळवटे ता. माढा येथील वनविभागाच्या जमिनीत गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तीनी अतिक्रमण केले असल्याची तक्रार, रिपाइं युवक (आ.) गटाचे माढा ता उपाध्यक्ष अभिमान गायकवाड यांनी करमाळा वनविभागाच्या कार्यालयात निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तरी गायकवाड यांनी पुढील प्रमाणे निवेदन दिले आहे. मौजे उपळवटे येथील वन विभागाच्या जमीनीत अतिक्रमण केले आहे. गट नंबर 177 मध्ये वन विभागाच्या क्षेत्रात मागील काही वर्षांपासून, उपळवटेचे विद्यमान सरपंच राहुल कृष्णात घाडगे यांनी खताचे दुकान व मोठे खत ठेवण्यासाठी गोडाऊन केले आहे. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी यांनी वन विभागाच्या गट नंबर 177 जमीनीत शेततळे तयार केले आहे. आणि त्यांचे बंधू सुदाम श्रीपती माळी यांनी वन विभागाच्या जमीनीत गट नंबर 177 मध्ये विहीर खोदून अतिक्रमण केले आहे. व सावता श्रीपती माळी यांनी वन विभागाच्या जागेमध्ये व पाझर तलावामध्ये, गट नंबर 178/2 आणि गट 73 मध्ये काही क्षेत्र पाझर तलावामध्ये येत आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण करून विहीर खोदून अतिक्रमण केले आहे. अशाप्रकारे गावातील लोकांनी वन विभागाच्या जागेमध्ये घरे, दुकाने, शेततळे व विहिरी खोदल्या आहेत. वन विभागाच्या जमिनीमध्ये ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) माढा तालुका युवक उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच अभिमान गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




Post a Comment