Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
             दि. 26/6/23 राज्यस्तरीय 'व्यसनमुक्ती दुत' पुरस्कार सोहळा वृषाली हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी नुकताच पार पडला. यावेळी समर्थ सोशल फाउंडेशनचे प्रवर्तक सादिक शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून आलेल्या 123 "व्यसनमुक्ती दूत" यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यांनी 250 लोकांना व्यसनमुक्त केले अशा लोकांसाठीच हा पुरस्कार देण्यात येतो.
           गोकुळ शिरगाव येथील सौ. नीता नारायण पोवार यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी समर्थ सोशल फाउंडेशनचे सुहास पाटील, नायब तहसीलदार विजय माने, संतोष पोवार, PNB Metlife चे ब्रांच मॅनेजर नारायण पोवार आदीजण उपस्थित होते.

Post a Comment