Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
             भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार कण्यात आला. या गोळीबारामध्ये आझाद हे थोडक्यात बचावले. परंतु हल्लेखोर मात्र अद्यापपर्यंत फरार आहेत. या अनुषंगाने रिपाई (आ.) युवक आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध करत, हल्लेखोरांना त्वरित अटक करुन, आझाद यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी संबंधित निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
         सदरील निवेदनात असे म्हटले आहे कि, भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आजाद यांच्यावर देवबंद येथे गोळीबार करण्यात आला. गोळीबार इतका तीव्र होता की, त्यांच्या गाडीमध्ये गोळ्या गाडीच्या दरवाजाच्या आरपार गेल्याचे दिसुन येते. सदरच्या गोळीबारात आझाद यांच्या कमरेला गोळी घासून गेल्यामुळे ते थोडक्यात बचावले गेले. या झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांनी वारंवार प्रशासनाकडे सुरक्षा देण्याची मागणी केलेली असताना देखील, प्रशासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळेच हा हल्ला झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी प्रशासनाने चंद्रशेखर आझाद यांना त्वरित सुरक्षा प्रदान करावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या वतीने देशभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडले जाईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

           तरी या निवेदनाच्या प्रती केंद्रीयमंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अदित्यनाथ योगी, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक करमाळा, उपनिरीक्षक पोलीस अधिक्षक करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी रिपाई (आ.) युवक आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे, तालुका कार्याध्यक्ष नितीन दामोदरे, पप्पू ओहोळ, अमोल गायकवाड, सचिन गायकवाड, संतोष लांडगे, लंकाबाई लांडगे, अश्विनी लांडगे, सचिन लांडगे, नितीन लांडगे, चिराग लांडगे, अभिजीत समिंदर आदीजण उपस्थित होते.

              एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कार्याचा आलेख ज्यावेळी उंचावला जातो. व त्या व्यक्तीचे विचार समाजाला प्रेरक ठरु लागतात. त्यावेळी समाजातील व्यक्तीना नाही तर, संबंधित विचारांना संपविण्यासाठी असे भ्याड हल्ले केले जातात. आंबेडकरवादी विचारांवर जेवढे हल्ले होतील, तेवढ्याच आक्रमकपणे त्या हल्ल्यांना सुध्दा प्रतिउत्तर दिले जाईल.

यशपाल कांबळे, रिपाई (आ.) युवक आघाडी, सोलापूर जिल्हाध्यक्ष 

Post a Comment