करमाळा शहरातील नामदेवराव जगताप ऊर्दु शाळेतील वाढीव वर्गांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिल्यामुळे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा करमाळा शहरातील समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्याचे आयोजन करमाळा येथील नालबंद मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध संघटनांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना दिले. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नसल्यावर मुख्याध्यापक पदाचा पदभार संबंधित शाळेतील शिक्षिकेकडे देत असताना, यासाठी संबंधित शिक्षिकेची सहमती घ्यावी. अशा आशयाचे निवेदन भिमदल सामाजिक संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनात म्हटले आहे कि, सोलापूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पात्र मुख्याध्यापक नसल्याने, मुख्याध्यापक पदाचे प्रभारी पदभार उपशिक्षक, उपशिक्षिका यांच्याकडे आहेत. असे पदभार महिला शिक्षिकाकडे असताना संबंधित शिक्षिकांना अनेक अडचणी येत असल्याचे दिसत आहे. तरी पात्र मुख्याध्यापक नसलेल्या शाळेतील मुख्याध्यापक पदाचे प्रभारी पदभार, महिला शिक्षिकांना देताना त्यांच्या सहमतीचा विचार करावा. संबंधित महिला शिक्षिकांचा होकार, नकार समजून घ्यावा. त्यांचा नकार असल्यास असे पदभार त्यांच्याकडे सोपवू नयेत. तरी आमच्या मागणीचा आपण सकारात्मक विचार कराल, आणि त्या संदर्भात आदेश देवून महिला कर्मचाऱ्यांना दिलासा द्याल. ही अपेक्षा.
अशा आशयाचे निवेदन भिमदल सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.



Post a Comment