करमाळा-प्रतिनिधी
काल मौजे दहिवडी येथे मोदीं @9 जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महासभेची सांगता झाल्यानंतर माढा लोकसभेच्या कोअर कमिटीची बैठक आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभ क्षेत्रात करावा अशी मागणी केली. व आम्ही मांगी तलाव लाभक्षेत्रातील दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन तयार केले आहे. ते आपणास लवकरच देणार आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना सांगितले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात, फेरजल नियोजनाची बैठक घेऊन लवकरच समाविष्ट करू असे आश्वासन दिले. या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment