Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
             करमाळा शहरामध्ये असणाऱ्या नामदेवराव जगताप ऊर्दु शाळेतील वाढीव वर्गास शिक्षणमंत्र्यांनी मान्यता दिल्यामुळे, २८ जुन रोजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा शहरातील समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रि.पा.ई. (आ.) युवक आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या वतीने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना महाराष्ट्रातील शिक्षकभरती विषयी निवेदन देण्यात आले आहे.

            सदरील निवेदनात त्यांनी सविस्तरपणे असे म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्यात एकूण दोन लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी दि. 21 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये परीक्षा दिली होती. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 67 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. औरंगाबाद खंडपीठाने 80 टक्के शिक्षक भरती करण्याकरिता मान्यता दिली आहे. त्यास आपल्या वित्त विभागाने देखील परवानगी दिलेली आहे. आपण शिक्षक भरतीची परीक्षा एकाच टप्प्यात घेतली आहे. मग शिक्षक भरती दोन टप्प्यात का? असा आमचा सवाल आहे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. दोन टप्प्यात होणारी पद भरती एकाच टप्प्यात घ्यावी. जर आपण पदभरती दोन टप्प्यात घेतली तर तीस हजार पद भरती होईल. पण 25000 विद्यार्थी हे आपल्या अटीमध्ये बसणार नाहीत. त्यानंतर त्यांचे वय निघून जाईल त्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन वेळीच १००% पदभरती करावी.

          अन्यथा रि.पा.ई. (आ.) युवक आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. तरी आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन, योग्य निर्णय घ्यावा. अशाप्रकारचे निवेदन रि.पा.ई. (आ.) युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे, मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे व इतर कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

            आताच आम्हाला शिक्षकभरती विषयी जे निवेदन प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने मी याठिकाणी स्पष्ट करु इच्छितो कि, महाराष्ट्र सरकारव्दारे लवकरच ८०% शिक्षकभरती केली जाईल. आणि सदरची शिक्षकभरती लवकरच करण्यात येईल.

दिपक केसरकर (शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य)

Post a Comment