करमाळा-प्रतिनिधी
मिरगव्हाण, अर्जननगर, फिसरे, हिसरे येथे वीजेचा लोड वाढत असल्यामुळे सतत वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच तापमान सुध्दा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतीला, जनावरांना सतत विहिरीतील पाणी पुरवठा करावा. लागतो. ज्यादिवशी शेतीला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही, त्यादिवशी शेतामध्ये लावलेले पिक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. अशा परिस्थितीमध्ये करमाळा महावितरणने सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा लावल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मिरगव्हाण, अर्जूननगर, फिसरे, हिसरे येथील संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत करमाळा मनसे ता. अध्यक्ष संजय घोलप यांच्याशी संपर्क साधून करमाळा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य प्रकारे मार्ग काढून द्यावा असे सांगितले. अन्यथा आंदोलन करण्याची शेतकऱ्यांनी त्यांची भुमिका बोलून दाखविली होती. यावेळी संतप्त शेतकरी व ग्रामस्थ यांना घेऊन घोलप यांनी करमाळा महावितरण कार्यालयाचे अधिकारी जाधव आणि वाघमारे यांच्या बरोबर चर्चेतुन मार्ग काढला. त्यामुळे संबंधित शेतकरी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.




Post a Comment