करमाळा-प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यापासुन प्रा. रामदास झोळ यांनी नेहमीच बागल गटावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपुर्वी बाळासाहेब पांढरे यांनी सुध्दा प्रा. झोळ यांच्यावर टिका केली होती. तर आता गणेश झोळ यांनी प्रा. रामदास झोळ यांच्यावर टिका केली आहे. त्यांनी अशी टिका केली आहे कि, प्रा. झोळ हे गोविंदपर्व कारखान्याच्या उभारणीपासुन बोर्डात असताना, शेतकऱ्यांची देणी, डिसीसी बँकेचे कोट्यवधी रु. थकित ठेवून प्रा. रामदास झोळ यांनी पळ काढला. असल्याची टिका गणेश झोळ यांनी केली आहे. आता या टिकेवर प्रा. रामदास झोळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे कि, गोविंदपर्व कारखान्याचा आणि माझा कसला ही संबंध नाही. त्या कारखान्याचा मी भागधारक अथवा संचालक बॉडीवर देखील नव्हतो. मी कोणावर हि टिका करत असताना माझ्याकडे तशाप्रकारचे पुरावे असतील, तरच मी समोरील व्यक्तीवर टिका करतो. जर गणेश झोळ यांच्याकडे गोविंदपर्व आणि माझा काही संबंध असल्याबाबतचे पुरावे असतील. तर त्यांनी तसे पुरावे सादर करावेत, अन्यथा मी गणेश झोळ यांच्यावर माझी नाहक बदनामी करत असल्याबाबत, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. आता जे वाशिंबे ग्रामपंचायतीविषयी माझ्यावर टिका करत आहेत. तर तेच गणेश झोळ माझ्या पॕनेलकडून त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी आमच्याकडे सतत ये-जा करत होते. त्यामुळे जो व्यक्ती आमच्या पॕनेलची उमेदवारी मिळावी म्हणुन सतत पळापळी करत होता. अशा व्यक्तिविषयी बोलणे सुध्दा मी योग्य समजत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे.




Post a Comment