करमाळा-प्रतिनिधी
शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले मिळाली पाहिजेत, म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या निवासस्थानावर शुक्रवार दिनांक 19 मे रोजी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून मकाईला गळीतास गेलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखाना प्रशासन व चेअरमन यांच्याशी संपर्क साधला परंतु ऊस बिले दिली नाहीत. त्याचप्रमाणे चेअरमन दिग्विजय बागल शेतकऱ्यांचे फोन सुध्दा उचलत नाहीत. कारखाना कर्मचाऱ्यांच्या पगारी सुद्धा थकलेल्या आहेत, कर्मचाऱ्यांना ही पगारी मिळाल्या पाहिजेत. ऊस वाहतूकदारांची बिले मिळाली पाहिजेत. या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने बहुजन संघर्ष सेनेने कुंभेज फाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळेस बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी ऊस बिले थकवलेल्या सर्व कारखान्यांना इशारा दिला होता. 30 एप्रिल पर्यंत उसाची बिले द्या, अन्यथा कारखान्याच्या चेअरमनच्या घरावरती मोर्चे काढू! परंतु अद्यापपर्यंत मकाई, कमलाई, भैरवनाथ विहाळ, घागरगाव इंदापुर, हिरडगाव या कारखान्यांनी उसाची बिले काढली नाहीत. म्हणून टप्प्याटप्प्याने ऊस बिल थकवलेल्या साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरावरती शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. याच धर्तीवर पहिला मोर्चा मकाई सहकारी साखर कारखाना यांच्या निवासस्थानावर दिनांक 19 मे 2023 वार-शुक्रवार ठीक सकाळी १० वाजता, उपजिल्हा रुग्णालय समोरील दत्त मंदिरापासून निघणार आहे. तेव्हा हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाची बिले मिळणार नाहीत. तोपर्यंत यापुढे भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील. व बिले मिळण्यासाठी प्रसंगी कोर्टामध्ये ऊस उत्पादकांची याचिका दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे सदरील बिले हि व्याजासहित वसूल केली जातील. याची दखल साखर कारखान्यांच्या चेअरमन यांनी घ्यावी. असा इशारा राजाभाऊ कदम यांनी दिला आहे.



Post a Comment