जातेगाव येथे दि. ४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच छगन ससाणे. ग्रामसेवक केवारे भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये जातेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी जगताप-शिंदे गटाच्या सौ. सुमित्रा बाळासाहेब धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी काशीनाथ कामठे, यशवंत शिंदे, प्रविण शिंदे, रामकिसन धुमाळ, प्रमोद वारे, महेंद्र वारे, अशोक शिंदे, बाबासाहेब शिंदे, अच्यूत कामटे, प्रकाश पाटील, भैरवनाथ निगडे, तुषार शिंदे, अजिनाथ निगडे, अमोल पाटील, दिलीप काकडे, मोहन धुमाळ, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शिंदे, डॉ. आशिष शिंदे, भाऊसाहेब शिंदे, भाऊसाहेब गाढवे, पप्पू पाटील, मंगेश धूमाळ, राजेंद्र पाटील, संपत शिंदे, सौ. गौरी शिंदे, सौ. अश्विनी शिंदे, सौ. वर्षा धुमाळ, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या निवडीनंतर मा.आ. जयवंतराव जगताप, आ. संजयमामा शिंदे व शंभूराजे जगताप यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



Post a Comment