Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
 
             सध्या मोबाईलची सर्वांनाच आवश्यकता आहे, काळानुसार बदल घडत गेले आणि प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल फोन आला. यामुळे सोशल मीडियाचा अतिवापर सुरू झाला यामध्ये महिला, लहान मुलं किंवा पुरुष मंडळी असतील, या सर्वांनाच मोबाईलच अक्षरशः व्यसन लागलेला आहे. परंतु मोबाईल जेवढा दैनंदिन कामासाठी उपयोगी आहे, तेवढे मोबाईलचे दुष्परिणाम ही आहेत. याचाही विचार महिलांनी करायला हवा ,आज-काल घरामध्ये कोणतेही कार्य असेल किंवा सनवार असतील. यामध्ये मोठ्या प्रमाणात फोटो, सेल्फी काढले जातात, आपण घरामध्ये ज्या मौल्यवान वस्तू घेतो. किंवा आपण दागदागिने घेतो त्याची माहितीही आपण नकळत ते सगळं फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हाट्सअप सोशल मीडिया वरती व्हायरल  करत असतो. मात्र आपल्याला कल्पना ही नसते की, आपली पूर्ण प्रोफाईल ची माहिती ही इतरांना सहजरीत्या दिसत असते. हजारो लोकांमध्ये याचा प्रसार होत असतो, यातून अनेक महिलांची फसवणूक झालेली आहे. हे आपण वारंवार बातम्यांमध्ये पाहत व वाचत असतो. 

              नुकतीच परवा एक व्हाट्सअप वरती पोस्ट आली त्यामध्ये पण असाच काही प्रकारचा गुन्हा घडलेला होता. त्या महिलेने फेसबुक, इंस्टाग्राम याचा अतिवापर केला. परंतु सोशल मीडियाचा अतिवापर त्या महिलेच्या अंगलट आला. त्या पोस्टमध्ये स्पष्ट दिसत आहे ,की त्या महिलेच्या फेसबुक वरून चोरट्याने त्या महिलेची पूर्ण माहिती काढली. आणि एके दिवशी घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन तिचे गावाकडून आलो आहे असं भासवत तिच्या घरामध्ये प्रवेश केला. व नंतर तिच्या गळ्याला चाकू लावून जबरी चोरी करण्यात आली. नशीब बलवत्तर म्हणून ती महिला वाचली. परंतु चोरट्यांनी घरातील सोने नाणे ,दाग ,दागिने महागाच्या साड्या, महागड्या वस्तू या सर्व लंपास केल्या. आपल्या अति उत्साहीपणामुळे किंवा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अशा एक ना अनेक घटना समाजामध्ये घडत असतात. म्हणूनच महिलांनी सावध राहायला हवे ,व सोशल मीडियाचा अतिवापर करणे टाळायला हवे. जेणेकरून आपल्याला व आपल्या कुटुंबाला यातून धोका निर्माण होणार नाही. असे आवाहन महिला प्रबोधनकार मांगी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शीला प्रवीण अवचर यांनी केलेले आहे.

Post a Comment