Header Ads Widget

 


जेऊर-प्रतिनिधी
            जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची 196 वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर बोलताना म्हणाले कि, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे क्रांतिकारक विचारांचे होते. दोघांनी हि त्यांचे सर्व जीवन वंचितांसाठी वाहिले होते. या देशातील दिन दुबळ्यांसाठी आपले अवघे जीवन देणाऱ्या, या महापुरुषाला महात्मा या पदवीने गौरवण्यात आले. गरीब, अस्पृश्य, शोषित, पीडित, दिन दुबळ्या बहुजन समाजातील जनतेमध्ये क्रांतीची ज्वाला पेटवून, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊन, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन, त्यांच्यामधील अंधश्रद्धा व अज्ञान दूर करण्यासाठी "शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी" ग्रंथाचे लिखाण करणारे, त्याचप्रमाणे छत्रपतींची समाधी शोधून त्यांच्या जीवनावर पोवाडा रचून, सर्वप्रथम शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांनी केली. अशाप्रकारचे विचार खटके यांनी मांडले.
         यावेळी कार्यक्रमासाठी बालाजी गावडे, राकेश पाटील, अतुल निर्मळ, आदिनाथ माने, विश्वनाथ सुरवसे, रणजीत कांबळे, निलेश पाटील, अभिजीत म्हमाणे, सोमा माने, सागर बनकर, हेमंत शिंदे, अजित उपादे, डॉक्टर हुंबे, औदुंबर वाशिंबेकर, राजू घाडगे, शिव म्हमाणे, पिंटू जाधव, भाग्यवंत पोळ, रमेश लगस, अमर साळवे, वैभव मोहिते, सुहास शिंदे, अमोल गुंड, मैत्रय सुरवसे, पराग मोरे, विकास माने, किरण माने, आकाश माने, अजित चांदणे, सुरज गरड, बाळासाहेब गरड आदीजण उपस्थित होते.


Post a Comment